UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा; पूजा खेडकर प्रकरण भोवले? 

प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर, तिचा राजीनामा केंद्रीय लोकसेवा आयोगाशी (UPSC) संबंधित वाद आणि आरोपांशी माझ्या राजीनाम्याचा कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.

UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा; पूजा खेडकर प्रकरण भोवले? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी(Manoj Soni Chairman of Union Public Service Commission) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resignation)दिला आहे. प्रख्यात शिक्षणतज्ञ मनोज सोनी (Educationist Manoj Soni) यांनी 28 जून 2017 रोजी UPSC आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला. 16 मे 2023 रोजी त्यांनी UPSC चेअरमन म्हणून शपथ घेतली. UPSC चे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ 15 मे 2029 रोजी संपणार होता.  पण त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे पुजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा आहे. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे सोनी यांनी संगितले आहे.

या संदर्भात बोलताना मनोज सोनी म्हणाले,  "प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर, तिचा राजीनामा केंद्रीय लोकसेवा आयोगाशी (UPSC) संबंधित वाद आणि आरोपांशी माझ्या राजीनाम्याचा कोणत्याही प्रकारे संबंधित नाही."  UPSC चेअरमन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पूर्वी राजीनामा दिला होता, जो अद्याप स्वीकारला गेला नव्हता, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 

UPSC चेअरमन होण्यापूर्वी, मनोज सोनी यांनी 1 ऑगस्ट 2009 ते 31 जुलै 2015 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ (BAOU), गुजरातचे कुलगुरू म्हणून काम केले. यापूर्वी त्यांनी एप्रिल 2005 ते एप्रिल 2008 या कालावधीत बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे (एमएसयू) कुलगुरू म्हणून काम केले होते. त्यावेळी सोनी हे सर्वात तरुण कुलगुरू ठरले होते.