UPSC द्वारे 506 जागांवर 'या' पदांसाठी राबवली जाणार भरती

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ मे २०२४ पर्यंत असणार आहे.  

UPSC द्वारे 506 जागांवर 'या' पदांसाठी राबवली जाणार भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारची नोकरी (Indian Govt Jobs) करण्यासाठी इच्छूक आहे, अशा उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. युपीएससी (UPSC) द्वारे असिस्टंट कमांडंट पदांसाठी (Post of Assistant Commandant) भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 506 पदे ही भरली जाणार आहेत. याबाबत नुसतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली (The notification was released) आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत येत्या १४ मेपर्यंत देण्यात आली आहे.  

युपीएससीच्या upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. असिस्टंट कमांडंट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अशा विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून असिस्टंट कमांडंटची पदे भरली जातील. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 25 असावे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी घेतलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 200 रूपये परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. भरतीची सविस्तर सूचना संकेतस्थळावर देण्यात आली आहे.