NEET UG निकालाची पीडीएफ पाहून विद्यार्थी संतापले; म्हणाले, 'संपूर्ण सेंटर मॅनेज झाले'

लोकांनी या PDF मध्ये एक खास गोष्ट हायलाइट केली आहे. हे पाहून विद्यार्थी आणि NEET तज्ज्ञ संतापले आहेत. ते म्हणतात की, ही पीडीएफ पाहिल्यावर असे दिसते की संपूर्ण केंद्र मॅनेज झाले आहे. लोक NEET वर फसवणुकीचा आरोप करत आहेत.

NEET UG निकालाची पीडीएफ पाहून विद्यार्थी संतापले; म्हणाले, 'संपूर्ण सेंटर मॅनेज झाले'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG परीक्षा २०२४ (NEET UG Exam 2024) चा निकाल नुकताच जाहीर (Results announced) झाला. दरम्यान, NTA कडून टॉपर विद्यार्थ्यांची लिस्ट प्रसिद्ध (List of topper students published by NTA) करण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे. या लिस्टमधील अनेक विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावरील असल्याचे आरोप केले जात आहेत. कारण टॉपर्सच्या लिस्ट मधील काही विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जवळजवळ असल्याचे सांगितले जात आहे. यावर NTA कडून कसलाही खुलासा देण्यात आलेला नाही.

लोकांनी या PDF मध्ये एक खास गोष्ट हायलाइट केली आहे. हे पाहून विद्यार्थी आणि NEET तज्ज्ञ संतापले आहेत. ते म्हणतात की, ही पीडीएफ पाहिल्यावर असे दिसते की संपूर्ण केंद्र मॅनेज झाले आहे. लोक NEET वर फसवणुकीचा आरोप करत आहेत.

पीडीएफचा जो भाग X वर शेअर केला जात आहे तो NEET 2024 टॉपर लिस्टमधील आहे. यामध्ये, NEET रोल नंबर, नाव, गुण आणि अनुक्रमांक 62 ते 69 पर्यंतची रँक हायलाइट केली आहे. वास्तविक, येथे NEET रोल मधील शेवटचे अंक थोडे मागे पुढे आहेत. यावरून असे लक्षात आहे की, हे सर्व उमेदवार एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावावर आडनाव नाही. 8 पैकी 6 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. इतर दोघांना 719, 718 गुण आहेत, त्यामुळे शंका वर्तवण्यात येत आहे. 

यावर्षी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG साठी नोंदणी केली होती. यापैकी २३३३२९७ म्हणजेच ९६.९% उमेदवार परीक्षेला बसले होते तर १३ लाखांहून अधिक म्हणजे ५६.४% उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीच्या नीट परीक्षेत तब्ब्ल ६७ विद्यार्थी ऑल इंडिया रँक १ आले आहेत. पेपर सोपा असल्याने जास्त संख्येने विद्यार्थी पास झाल्याचं म्हटलं जात आहे.