शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याच्या आरोपावर NCERT चे स्पष्टीकरण

दंगलीबद्दल शिकवल्याने हिंसक आणि असंतुष्ठ नागरिक निर्माण होऊ शकतात. पुस्तकांमध्ये बदल करणे हा वार्षिक पुनरावृत्तीचा भाग आहे. हा निषेधाचा विषय बनवू नये. सर्व काही तथ्य आणि पुराव्यावर आधारित आहे, असे स्पष्टीकरण एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी दिले आहे.

शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याच्या आरोपावर NCERT चे स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता 11वी आणि 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकांमध्ये (Political science book) मोठे बदल केले आहेत. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यापासून ते गुजरात दंगल (गोध्रा घटना) पर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. यावरून शालेय अभ्यासक्रमाचे (school curriculum) भगवेकरण केल्याचा आरोप NCERT वर होत आहे. यावर आता NCERT कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नवीन पुस्तकात अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यापासून ते गुजरात दंगल या घटनांचा उल्लेख अशा प्रकारे करण्यात आला आहे की, हिंसाचार आणि दंगलींवर जास्त भर देण्यात आलेला नाही. याविषयी बोलताना, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी (Dinesh Prasad Saklani) यांनी स्पष्ट केले की "दंगलीबद्दल शिकवल्याने हिंसक आणि असंतुष्ठ नागरिक निर्माण होऊ शकतात. पुस्तकांमध्ये बदल करणे हा वार्षिक पुनरावृत्तीचा भाग आहे. हा निषेधाचा विषय बनवू नये. सर्व काही तथ्य आणि पुराव्यावर आधारित आहे.

शालेय पुस्तकात दंगली का शिकवायच्या? आम्हाला हिंसक आणि उदासीन व्यक्ती नव्हे तर, सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत याशिवाय लहान मुलांना दंगलीबद्दल शिकवायचे का? जेव्हा ते मोठे होतात तेव्हा ते याबद्दल शिकू शकतात. पण ते शालेय पुस्तकांत का शिकवावे?  जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना काय घडलं? कसं घडलं? का घडलं? हे समजू द्या. हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक निर्माण करणे हा आपल्या शिक्षणाचा उद्देश नाही. द्वेष आणि हिंसा हे शिकवण्यासारखे विषय नाहीत. बदलांना होणारा विरोध मूर्खपणाचा आहे, असेही सकलानी यांनी सांगितले आहे.