सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅगेलेस दिवस; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण अधिक आनंददायी, अनुभवात्मक आणि तणावमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Education) इयत्ता सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी बॅगेलेस दिवस (Bagless Day for students in grades 6-8) लागू (Bagless day applies)करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सादर (Guidelines published) केली आहेत. हा उपक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी (NEP) 2020 चा एक भाग आहे. विद्यार्थी 10 दिवसांच्या कालावधीत त्यांच्या शाळेत दप्तरविना सहभागी होऊन, व्यावसायिक प्रशिक्षण आणि हाताने शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करतील.
पारंपारिक शिक्षणासह व व्यावहारिक कौशल्ये एकत्रित करण्यात मदत करण्यासाठी NEP ने 10 दिवसांच्या बॅगेलेस कालावधीची शिफारस केली. शिफारसनुसार, इयत्ता सहावी ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांनी 10 दिवसांच्या बॅगेलेस उपक्रमात सहभागी होता येणार आहे. हा उपक्रम नियमित अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणून साजरा केला जाणार आहे. विद्यार्थी स्थानिक व्यावसायिकांसोबत काम करतील. विविध हस्तकलांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतील.यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानातील सीमा कमी होणार नाही आणि ज्ञानाचा उपयोग पण मुलांना कामाच्या क्षेत्रातील कौशल्याची आवश्यकता लक्षात येईल. त्यामुळे त्यांना भविष्यातील करिअरचा मार्ग ठरवण्यास मदत होईल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
प्रत्येक विद्यार्थी इयत्ता 6 वी ते 8 वी दरम्यान एक कोर्स घेईल, जो राज्यांनी ठरवल्याप्रमाणे सुतारकाम, इलेक्ट्रिक वर्क, मेटल वर्क, बागकाम, मातीची भांडी बनवणे इत्यादीसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक हस्तकलेच्या नमुन्याचे सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव देईल. मंत्रालयाने म्हटले आहे की, इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी वर्षातून कोणत्या 10 दिवसांच्या बॅगेलेस कालावधीत सहभागी होतील.
भाजी मंडईला भेट देऊन पाहणी, धर्मादाय भेटी, पाळीव प्राण्यांच्या काळजीवर सर्वेक्षण आणि अहवाल लेखन, डूडलिंग, पतंग बनवणे आणि उडवणेच पुस्तक मेळा आयोजित करणे, वटवृक्षाखाली बसणे, आणि बायोगॅस संयंत्र आणि सौर ऊर्जा पार्कला भेट देणे हे NCERT मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिफारस केलेल्या क्रियाकलापांपैकी एक आहेत.