NSUI च्या अध्यक्षावर गुन्हा दाखल; विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग; व्हिडिओ व्हायरल 

संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस प्रशासनाने विनयभंग व विद्यार्थिनीला छळ केल्याप्रकरणी अक्षय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

NSUI च्या अध्यक्षावर गुन्हा दाखल; विद्यापीठातील विद्यार्थीनीचा विनयभंग; व्हिडिओ व्हायरल 
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)एका विद्यार्थीनीला टॉर्चर करून तिचा मानसिक छळ करून तिच्याबरोबर दुर्व्यवहार करणाऱ्या अक्षय कांबळे (Akshay Kamble)यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Police registered a case)आहे.अक्षय कांबळे हा पुणे विद्यापीठ एनएसयुआय (Pune University NSUI)संघटनेचा पुणे विद्यापीठाचा अध्यक्ष होता.मात्र, ही घटना समोर आल्यानंतर संघटनेने त्याला निलंबित केले आहे.

अक्षय कांबळे याने विद्यार्थिनींना मोबाईलवर मेसेज करून त्रास दिला .तसेच याबाबत समोर येऊन बोलण्याचे धाडस दाखवणाऱ्या त्या विद्यार्थीनीला टॉर्चर करून तिचा मानसिक छळ केला, असा आरोप अभाविप परिषदेने केला आहे. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस प्रशासनाने विनयभंग व विद्यार्थिनीला छळ केल्याप्रकरणी अक्षय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पिडीत विद्यार्थीनीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.तिने अक्षय कांबळे विरोधात व्हिडिओ प्रसिध्द करून कारवाईची मागणी केली आहे.तसेच संबंधित विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने सुद्धा कारवाई करून सर्व विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने आश्वस्त करावे, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

व्हिडिओची लिंक :https://www.youtube.com/shorts/NEF1resk1P4