जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा अर्जास या तारखेपासून सुरूवात...
संयुक्त प्रवेश परीक्षा प्रगत परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि 2 मे 2025 पर्यंत चालेल. परीक्षेसाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२५ आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र 11 मे 2025 रोजी प्रसिद्ध केले जातील. तर हॉल तिकीट अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आयआयटी कानपूरने (IIT Kanpur) प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार, संयुक्त प्रवेश परीक्षा प्रगत परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि 2 मे 2025 पर्यंत चालेल. परीक्षेसाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२५ आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र 11 मे 2025 रोजी प्रसिद्ध केले जातील. तर हॉल तिकीट अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.
या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व प्रवर्गातील महिला उमेदवार आणि SC, ST आणि PWD उमेदवारांना 1600 रुपये शुल्क भरावे लागेल. याशिवाय इतर सर्व उमेदवारांना 3200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
eduvarta@gmail.com