MPSC : लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा तन्मय कटुळे राज्यात प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६ हजार ५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र ठरले आहेत.

एज्युवार्त न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) १७ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ (Maharashtra Group-C Services Main Examination-2023) मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर (Clerk-Typist result declared) करण्यात आला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील तन्मय तानाजी कटुळे हा राज्यातून प्रथम (Tanmay Katule first in the state) आले आहेत. मागासवर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील किशोर चंद्रकांत किसवे हा राज्यात प्रथम आले आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील दुर्गा विजयराव गावडे या राज्यात प्रथम आल्या आहेत. त्यामुळे मागील दीड वर्षापासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
MPSC प्रलंबित निकालाचा मुद्दा सभागृहात गाजला, कालमर्यादा लागू होणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६ हजार ५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र ठरले आहेत.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या संवर्गाकरिता प्रतीक्षायादी कार्यान्वित करण्यात येणार नाही. अधिक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगाने कळविले आहे.