केंद्रीय विद्यालय प्रवेशाचा अर्ज या चुकीमुळे होतोय रद्द  

अर्ज भरताना पालक मोठी चुक करत असून त्यामुळे ते अर्ज बाद ठरवले जात आहेत.

केंद्रीय विद्यालय प्रवेशाचा अर्ज या चुकीमुळे होतोय  रद्द  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये (Kendriya Vidyalaya) एप्रिलपासून इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. K.V. प्रवेश प्रक्रिया आयोजित करणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटनेने इयत्ता 1 साठी ऑनलाइन नोंदणी अर्ज (application ) जारी केला आहे. मात्र, अर्ज भरताना पालक मोठी चुक करत असून त्यामुळे ते अर्ज बाद ठरवले जात आहेत. या संदर्भात संघटनेने kvsangathan.nic.in या अधिकृत वेबसाइटवर एक नवीन नोटीस जारी केली आहे.

इयत्ता पहिलीसाठी प्रवेश अर्ज करताना काही पालक KVS मोबाइल ॲपवर नोंदणी करत आहेत.मात्र, अशा पद्धतीने केली जाणारी नोंदणी स्वीकारली जाणार नाही,असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

संघटनेने नोटीसमध्ये म्हटले आहे की, "2024-25 या सत्रात अनेक पालक आपल्या पाल्याला केंद्रीय विद्यालय इयत्ता 1 मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी करत असलेली ऑनलाइन नोंदणी चुकीची असल्याचे दिसून येत आहे. हे पालक KVS मोबाइल ॲपवर नोंदणी करत आहेत.

या संदर्भात कळविण्यात येते की KVS मोबाइल ॲपद्वारे केले जाणारे असे कोणतेही अर्ज बेकायदेशीर मानले जातील, असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. लक्षात ठेवा फक्त kvsonlineadmission.kvs.gov.in ही केंद्रीय विद्यालय प्रवेश अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे. तुम्ही KV प्रवेशासाठी फक्त या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येतील."