नोकरी शोधणे झाले सोपे; ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट पोर्टल

हे पोर्टल लवकरच AICTE च्या राष्ट्रीय इंटर्नशिप पोर्टलशी देखील जोडले जाईल. हे वापरकर्ता अनुकूल देखील केले गेले आहे, जेणेकरुन सामान्य विद्यार्थ्यांना देखील ते सहजपणे वापरता येईल.

नोकरी शोधणे झाले सोपे; ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट पोर्टल
AICTE Placement Portal

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) ग्रामीण आणि आदिवासी भागातील तंत्र महाविद्यालयांच्या (Technical College) विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट पोर्टल (AICTE Placement Portal) सुरू केले आहे. याद्वारे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या नोकऱ्या आणि कपंन्यांची  माहिती मिळणार आहे. याशिवाय कंपन्या संबंधित महाविद्यालयांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट्स करणार आहेत. पोर्टल सुरू झाल्यानंतर काही तासांतच २२०० हून अधिक सरकारी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यात नोंदणी केली आहे.

 

‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्राध्यापक टी.जी. सीमाराम म्हणाले की, "मोठ्या कंपन्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंटसाठी जात नाहीत. यासाठी एक विशेष AICTE प्लेसमेंट पोर्टल तयार करण्यात आले आहे.  पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरी बसून नोकरीचे हजारो पर्याय उपलब्ध होणार आहेत. हे पोर्टल विद्यार्थी आणि कपंनी  यांच्यात सेतू म्हणून काम करेल. यामुळे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी थेट संपर्क साधण्यास मदत होणार आहे. ग्रामीण वातावरणाच्या आधारे पोर्टलची रचना करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत माहिती मिळेल."

पुण्यातील क्रीडा विद्यापीठ अजून कागदावरच अन् दुसऱ्या विद्यापीठासाठी जोरदार हालचाली

 

हे पोर्टल लवकरच AICTE च्या राष्ट्रीय इंटर्नशिप पोर्टलशी देखील जोडले जाईल. हे वापरकर्ता अनुकूल देखील केले गेले आहे, जेणेकरुन सामान्य विद्यार्थ्यांना देखील ते सहजपणे वापरता येईल. येथे हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज भासणार नाही. नेटवर्किंग टूल्स, करिअर कौन्सिलिंग, इंटरव्ह्यू टिप्स आदी फीचर्सचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

 

विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी AICTE हेल्पलाइन देखील उपलब्ध असेल. उच्च शिक्षणावरील अहवालानुसार, भारतात एकूण ४२ हजार ३४३  महाविद्यालये आहेत, त्यापैकी सुमारे २६ हजार  (६० टक्के ) महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी ग्रामीण आणि आदिवासी भागात शिकतात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k