इस्रायलमध्ये अडकले ९०० भारतीय विद्यार्थी; डॉक्टरेट, पदव्युत्तर पदवीचे घेतायेत शिक्षण

दूतावासाने बुधवारी (दि. १२) विशेष उड्डाणासाठी नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांच्या पहिल्या तुकडीला ईमेल केला आहे.

इस्रायलमध्ये अडकले ९०० भारतीय विद्यार्थी; डॉक्टरेट, पदव्युत्तर पदवीचे घेतायेत शिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Israel Palestine War : युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना (Indian Citizens) परत आणण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय नागरिक अडकले आहेत, यामध्ये ९०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

दूतावासाने बुधवारी (दि. १२) विशेष उड्डाणासाठी नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांच्या पहिल्या तुकडीला ईमेल केला आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, इतर नोंदणीकृत लोकांना हा संदेश त्यानंतरच्या विमानासाठी पाठविला जाईल. या संदर्भात विशेष चार्टर उड्डाणे आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे.

उच्च शिक्षण आयोग लवकरच अस्तित्वात; वैद्यकीय, विधी महाविद्यालयांना वगळले

 

परदेशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी  त्यांच्या X अकाउंटवर  केला आहे. इस्त्रायलमधील परिस्थिती विषयी भारतीय माध्यमांना माहिती देताना काही विद्यार्थी म्हणाले, "मागील काही महिन्यांपासून इस्राईल मधील वातावरण बिघडले होते. पण विद्यार्थ्यांना याविषयी आपापसात चर्चा करण्याची मनाई होती.

 

सायरन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेल्या बंकरमध्ये लपायचे, असे निर्देश आधीच विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. सगळ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एक विशेष ऍप डाउनलोड करण्यात आला आहे. या ऍप वर मिसाईल हल्ल्याची सूचना देण्यात येते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. सुमारे ९०० विद्यार्थी इस्राईलमध्ये  विविध संस्था आणि विद्यापीठांमध्ये शिकत आहेत, त्यापैकी बहुतांश पदवीधर, डॉक्टरेट आणि पदव्युत्तर  अभ्यासक्रम घेत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k