मराठी माध्यमांच्या शाळांना “शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणा”साठी सहभागी करून घ्या
मराठी माध्यमाचे कोणतेही शिक्षक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापक संघटनांनी मागणी केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मराठी माध्यमाच्या (अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत) सर्व शाळांना (All schools of Marathi medium (partially aided, unaided, self-financing) शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणासाठी (Teacher capacity building training) सहभागी करून घ्यावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने (Maharashtra State Secondary and Higher Secondary School Principals' Association) केली आहे. अशा आशयाचे पत्र संघाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (State Council of Educational Research and Training) पाठवले आहे.
दरम्यान, हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी इयत्तांना शिकवणाऱ्या सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी लागू आहे. परंतु आता हे प्रशिक्षण सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना मिळावे यासाठी मुख्याध्यापक संघटना प्रयत्न करताना दिसून येत आहे.
eduvarta@gmail.com