गोळवलकर गुरुजी शाळेत भरला 'आधुनिक सावित्रींचा वर्ग'
पारंपरिक वेशभूषेतील सावित्रीच्या लेकी अभ्यासासाठी लॅपटॉप, मोबाईल, टॅब, मोबाईल फोन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात 'आधुनिक सावित्रींचा वर्ग' भरविण्यात आला होता. सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून विद्यार्थिनी आणि शिक्षक शाळेत आले होते. या विद्यार्थिनींनी वर्गात विज्ञान व माहिती तंत्रज्ञान याविषयीचा धडा शिकला.
पारंपरिक वेशभूषेतील सावित्रीच्या लेकी अभ्यासासाठी लॅपटॉप, मोबाईल, टॅब, मोबाईल फोन अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून भारतीय ज्ञान परंपरेला माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन जगात भारताला विश्वगुरू बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी सांगितले.सोनल एरंडे, प्रिया जोशी, श्रद्धा सावळेकर या शिक्षकांनी संयोजन केले.