सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ 17 जानेवारीला 

तब्बल १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ 17 जानेवारीला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे (Examination Department of Savitribai Phule Pune University) येत्या 17 जानेवारी रोजी पदवी प्रदान समारंभाचे (convocation ceremony) आयोजन केले जाणार आहे.यावर्षी तब्बल १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस (Governor and Chancellor of the University Ramesh Bais) उपस्थित राहणार आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठातर्फे वर्षातून दोन वेळा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते त्यामुळे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते.अखेर 17 जानेवारी रोजी विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ होणार आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच पदवी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.तसेच 70 ते 80 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडलचे वितरण करण्यात येणार असून त्यात एकट्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे 17 विद्यार्थी आहेत. 

हेही वाचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव निश्चित ; यांच्या गळयात पडणार कुलगुरू पदाची माळ

 भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो)अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी पदवी प्रदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे,असा विद्यापीठाचा प्रयत्न होता.मात्र, काही कारणास्तव सोमनाथ यांचे येणे रद्द झाले आहे.आता नवीन व्यक्ती पदवी प्रदान समारंभास येणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, दर वर्षाप्रमाणे यंदाही विद्यापीठातील कार्यक्रमात निवडक विॉद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.काही विद्यार्थ्यांना पोस्टाने तर काहींना त्यांच्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे.