वारकरी शिक्षण संस्थेत गुंडांचा धुडगूस! ११ विद्यार्थ्यांना मारहाण, संस्थाचालकाच्या वृद्ध वडिलांचे फोडले डोके..

नर्मदेश्वर गुरुकुलम् ही वारकरी परंपरेवर आधारित निवासी शिक्षणसंस्था असून, येथे सध्या ४२ विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेत शालेय शिक्षणही घेत आहेत. सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने काही विद्यार्थी पेपर देऊन गुरुकुलाकडे जात होते. या दोघांनी रस्त्यात दोन विद्यार्थ्यांना थांबवून "पेपर दाखवा" अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना धक्काबुकी करून मारहाण केली.

वारकरी शिक्षण संस्थेत गुंडांचा धुडगूस! ११ विद्यार्थ्यांना मारहाण, संस्थाचालकाच्या वृद्ध वडिलांचे फोडले डोके..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बीड जिल्ह्यातील परळीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परळी शहरातील ४० फूट रोडवरील सिद्धेश्वर नगर (Parli City 40 Feet Road Siddheshwar Nagar) परिसरात असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत (Warkari Educational Institute) शनिवारी सायंकाळी दोन गुंडांनी अक्षरशः धुडगूस घातला. नर्मदेश्वर गुरुकुलम् या निवासी वारकरी शिक्षण संस्थेतील (Narmadeshwar Gurukulam Residential Warkari Education Institute) ११ विद्यार्थ्यांना निर्दय मारहाण केली असून संस्थाचालकाच्या वृद्ध वडिलांवरही हल्ला करून त्यांचे डोके फोडले. या घटनेने परळीत एकच खळबळ उडाली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! AI च्या मदतीने ३६ विद्यार्थिनींचे बनवले अश्लील फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, नर्मदेश्वर गुरुकुलम् ही वारकरी परंपरेवर आधारित निवासी शिक्षणसंस्था असून, येथे सध्या ४२ विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेत शालेय शिक्षणही घेत आहेत. सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने काही विद्यार्थी पेपर देऊन गुरुकुलाकडे जात होते. या दोघांनी रस्त्यात दोन विद्यार्थ्यांना थांबवून "पेपर दाखवा" अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना धक्काबुकी करून मारहाण केली. विद्यार्थी भयभीत होऊन गुरुकुलात धावत पोहोचले, मात्र आरोपी त्यांच्या पाठोपाठ आत घुसले आणि कंबरेचा बेल्ट व काठीने विद्यार्थ्यांना अंधाधुंद मारहाण केली. या प्रकरणानंतर दिनेश रावसाहेब माने (रा. चाळीसफुटी रोड, परळी वै.) व बाळु बाबुराव एकिलवाळे (रा. सिद्धेश्वर नगर, परळी वै.) या दोन गावगुंडावरती परळी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या मारहाणीत ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हातापायाला व डोक्याला जखमा झाल्या आहेत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हा सर्व गोंधळ पाहून संस्थाचालकाचे वडील बालासाहेब शिंदे तिथे गेले असता त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. सध्या त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परळी शहरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणसंस्थेत घुसून केलेल्या या अमानुष मारहाणीचा विविध सामाजिक व धार्मिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.