धक्कादायक! AI च्या मदतीने ३६ विद्यार्थिनींचे बनवले अश्लील फोटो

आरोपी विद्यार्थी सय्यद रहीम अदनान अलीने त्याच्या ३६ विद्यार्थिनींच्या फोटोंचे पोर्नोग्राफिक (अश्लील) फोटो बनवले. हे फोटो बनवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत, अक्षेपार्ह स्थितीत डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आले होते. ही घटना रायपूर येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी विद्यार्थी सय्यद रहीम अदनान अली याला पोलिसांनी अटक केली आहे.

धक्कादायक! AI च्या मदतीने ३६ विद्यार्थिनींचे बनवले अश्लील फोटो

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंटरनेटच्या डिजिटल युगात आता नव्या तंत्रज्ञानाचे म्हणजेच एआयची (AI) चे आगमन झाले आहे. या AI चा वापर जेवढ्या चांगल्या गोष्टींसाठी केला जात आहे, तेवढ्याच वाईट गोष्टींसाठी केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. AI तंत्रज्ञानाच्या (AI technology) माध्यमातून अनेक लोक शिक्षणाचे धडेही गिरवत असल्याचे समोर आले आहे. मात्र, छत्तीसगड येथील इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी या महाविद्यालयात (International Institute of Information Technology College) AI ची मदत घेऊन एका विद्यार्थ्यानी आपल्याच महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींच्या सध्या फोटोचे अश्लील फोटो (Created pornographic photos) तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

१० वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती सुरू

या प्रकरणात महाविद्यालयीन प्रशासनाने कडक पाऊले उचलत आरोपी विद्यार्थ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणात काही माहिती समोर आली त्याआधारे आरोपी विद्यार्थी सय्यद रहीम अदनान अलीने त्याच्या ३६ विद्यार्थिनींच्या फोटोंचे पोर्नोग्राफिक (अश्लील) फोटो बनवले. हे फोटो बनवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत, अक्षेपार्ह स्थितीत डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आले होते. ही घटना रायपूर येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी विद्यार्थी सय्यद रहीम अदनान अली याला पोलिसांनी अटक केली आहे.

महाविद्यालय प्रशासन घटनेची माहिती घेत ताबडतोब अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली. एकूण तपासातून विद्यार्थ्याचा गुन्हा केल्याचे आता उघड झाले आहे. नंतर संस्थेने राखी पोलीस ठाण्यात संपूर्ण अहवाल सादर करत आरोपींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात आयटी कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलि‍सांकडून संबंधित विद्यार्थ्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आणि पुढील तपास करण्यात येत आहे. हे बनावट फोटो इतरत्र शेअर करण्यात आले आहेत. या प्रकरणाबाबत पोलीस पुढील शोध घेत आहेत.