शिक्षक भरतीत कॅटेगिरीचा कटऑफ ओपन पेक्षा जास्त का ? कारण आले समोर 

शिक्षकभरतीसाठी टीईटी ही पात्रता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टीएआयटी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहे.

शिक्षक भरतीत कॅटेगिरीचा कटऑफ ओपन पेक्षा जास्त का ? कारण आले समोर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभगातर्फे (Teacher Recruitment) पवित्र पोर्टलच्या (pavitra portal )माध्यमातून शिक्षक भरती राबवली जात असून नुकतीच पात्रतेनुसार उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.त्यात खुल्या (open-ओपन) व विविध आरक्षित प्रवर्गातील (category- कॅटेगिरी) वेगवेगळ्या कट ऑफ (Cut-off) बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कटऑफ खुल्या पेक्षा काही ठिकाणी जास्त आल्या आहे. या बाबत उमेदवार प्रश्न उपस्थित करीत आहेत.त्यावर स्वत: राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (State Education Commissioner Surajya Mandhare) यांनी स्पष्टीकारण दिले आहे. 

सूजर मांढरे म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्र. ११२५४/२०१९ मधील सिविल अर्ज क्र. ८२५९/२०१९ मध्ये दि. २४/१०/२०१९ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित ( खुला) प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत.तसेच केंद्र शासनाच्या दि ०१/०७/१९९८ व दि. ०४/०४/२०१८ च्या ज्ञापनामध्ये देखील अशाप्रकारे  सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद आहे.  

हेही वाचा: शिक्षण राज्यात वीस वर्षांनंतर पहिल्या टप्प्यात भरली शिक्षकांची 11 हजार पदे - शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

राज्य शासनाच्या विविध  प्रकारच्या  उदा. तलाठी भरती , ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा  त्या त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्याची तरतूद आहे.या व अशा अन्य प्रचलित तरतुदी शिक्षक भरती प्रक्रिया राबवताना विचारात घेण्यात आल्या आहेत,असे मांढरे यांनी स्पष्ट केले.

सूजर मांढरे म्हणाले, या शिक्षकभरतीसाठी टीईटी ही पात्रता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टीएआयटी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहे.त्यामुळे कट ऑफ मध्ये हा फरक दिसतो.परंतु तो पूर्णपणे नियमानुसार आहे.