शिक्षिकेने शिक्षण घेतलेल्या संस्थेला दिली आयुष्यभराच्या पीएफची रक्कम
विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून १९७३ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ संस्थेशी माझा संबंध आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात माझे व्यक्तिमत्त्व फुलले, संस्थेने मला ओळख दिली. त्यामुळे संस्थेबद्दल वाटणारे प्रेम मनाच्या तळातून आलेले आहे. आज मी देत असलेल्या निधीपेक्षा संस्थेने मला किती तरी पटीने अधिक दिले आहे, असा भावना यावेळी माजी शिक्षिका माणिक फुलंब्रीकर यांनी व्यक्त केल्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शासकिय कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) उपयोग अनेकजन मोठ्या गुंवतणुकीसाठी करतात. मात्र, 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी' च्या माजी विद्यार्थिनी आणि माजी शिक्षिका माणिक फुलंब्रीकर (Former teacher Manik Phulambrikar) या याला अपवाद ठरल्या आहेत. फुलंब्रीकर यांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील मोठा भाग आपली कारकीर्द घडलेल्या शिक्षण संस्थेला देण्याचा दुर्मीळ योग गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून आला. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात 'मएसो'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबा शिंदे (President Baba Shinde) यांच्याकडे त्यांनी हा एक कोटी रुपयांचा निधी सुपूर्द (Fund of one crore rupees handed over) केला.यावेळी खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.
फर्ग्युसन कॉलेजच्या अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या; दोन अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी
विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून १९७३ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ संस्थेशी माझा संबंध आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात माझे व्यक्तिमत्त्व फुलले, संस्थेने मला ओळख दिली. त्यामुळे संस्थेबद्दल वाटणारे प्रेम मनाच्या तळातून आलेले आहे. आज मी देत असलेल्या निधीपेक्षा संस्थेने मला किती तरी पटीने अधिक दिले आहे, असा भावना यावेळी माजी शिक्षिका माणिक फुलंब्रीकर यांनी व्यक्त केल्या.
एका मध्यमवर्गीय निवृत्त शिक्षिकेने स्वकमाईचा इतका मोठा भाग देणगी म्हणून देण्याचा हा प्रसंग दुर्मीळ आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण त्यांचे अनुकरणही करतील, याची मला खात्री आहे. त्यांच्या इच्छेनुसार या निधीतून महाविद्यालयातील प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्यात येईल. फुलंब्रीकर यांची कोणतीही अपेक्षा नसली, तरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रयोगशाळेला त्यांचे नाव देण्यात येईल,' असे मएसो'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
eduvarta@gmail.com