दहावी-बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांच्या प्रस्तावासाठी मुदतवाढ
क्रीडा गुणांसाठी गेल्यावर्षीपर्यंत प्रत्यक्ष अर्ज म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत होता मात्र, यंदा पहिल्यांदाच ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीत करण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी (10th and 12th grade sports students) अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) राज्यातील दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र, अर्ज करण्यासाठीचे ‘आपले सरकार’ सेवा पोर्टल (Aaple Sarkar' service portal closed) हे दिनांक 14 एप्रिलपर्यंत देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी आता 21 एप्रिल पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. (deadline has been extended)
यंदा पहिल्यांदाच ऑफलाइन प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष नाविन्य मिळवलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतात. क्रीडा गुणांसाठी गेल्यावर्षीपर्यंत प्रत्यक्ष अर्ज म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत होता मात्र, यंदा पहिल्यांदाच ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीत करण्यात आली आहे.
सवलतीच्या क्रीडा गुणांच्या ऑनलाइन प्रस्तावांची ‘आपले सरकार’ या संकेतस्थळाद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाने सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, ‘आपले सरकार’ संकेतस्थळ देखभालीच्या कामासाठी १० ते १४ एप्रिल या कालावधीत बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एकच दिवस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने जिल्हा क्रीडा कार्यालयाने सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.