UPSC NDA -2 चा निकाल २०२४ जाहीर, ७९२ उमेदवारांची निवड

उमेदवारांच्या लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय परीक्षेचे निकाल गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जात नाहीत. लेखी परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. त्यानंतर एसएसबी मुलाखती नियोजित करण्यात आल्या. या दोन्ही परीक्षांमध्ये, उमेदवारांना यशस्वी लष्करी अधिकारी बनण्याच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

UPSC NDA -2 चा निकाल २०२४ जाहीर, ७९२ उमेदवारांची निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) UPSC  राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा २ - २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. ( has declared the results of the National Defence Academy and Naval Academy Examination 2 - 2024) या परीक्षेत एकूण ७९२ उमेदवार पात्र ठरले आहेत. हे निवडलेले उमेदवार भविष्यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी बनतील.  एनडीए एनए परीक्षा २ – २०२४ च्या निकालात इमॉन घोषने अव्वल स्थान पटकावले आहे. इमॉनचे नाव गुणवत्ता यादीत पहिल्या स्थानावर आहे.

 लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ही परीक्षा १ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. यानंतर, संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सेवा निवड मंडळाने (SSB) या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. ज्याचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेतील निवडीनंतर, राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या १५४ व्या अभ्यासक्रमात आणि भारतीय नौदल अकादमीच्या ११६ व्या अभ्यासक्रमात या उमेदवारांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.