डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ.सुरेश गोसावी 

सोमवारपासून गोसावी हे नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाचे कामकाज पाहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ.सुरेश गोसावी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांच्याकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) प्रभारी कुलगुरू (In-charge Vice-Chancellor) पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. येत्या सोमवारपासून गोसावी हे नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाचे कामकाज पाहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाल संपल्यामुळे गोसावी यांच्याकडे प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू असून येत्या 4 जानेवारी रोजी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यातील एका उमेदवारांच्या गळ्यात कुलगुरूपदाची  माळ पडणार आहे. त्यामुळे डॉ. संजय ढोले आणि डॉ. विलास खरात तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, डॉ. ज्योती जाधव आणि प्रा.राजेंद्र काकडे यापैकी कुलगुरूपदी विराजमान होण्याचा मान कोणाला मिळणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.

कुलगुरू पदाच्या मुलाखती काही दिवसांवर येऊन ठेपले असल्या तरी काही वेळा नाव जाहीर करण्यास थोडासा अवधी घेतला जातो. किंवा त्याच दिवशी नाव जाहीर केले जाते. त्यामुळे नवीन कुलगुरूंकडे सूत्र सुपूर्त करेपर्यंत कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी हे विद्यापीठाचे कामकाज पाहणार आहेत.