डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. विजय फुलारी

डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव , प्रा.राजेंद्र काकडे, डॉ. संजय ढोले , डॉ. विलास खरात , या पाच उमेदवारांमधून अखेर डॉ. विजय फुलारी यांच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. विजय फुलारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) नवीन कुलगुरू (New vice chancellor) पदी कोल्हापूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. विजय फुलारी यांची निवड झाली असून याबाबतची अधिकृत घोषणा राज्यपाल कार्यालयातर्फे नुकतीच करण्यात आली. लवकरच ते प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून पूर्णवेळ कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. दरम्यान, राज्यपाल यांनी नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.  

राजभवन येथे गुरूवारी (दि.4) दुपारी 4  ते  सायंकाळी 7 या कालावधीत कुलगुरू पदाच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले, डॉ. विलास खरात आणि प्रा.राजेंद्र काकडे (Dr. Sanjay Dhole, Dr. Vilas Kharat, Dr. Vijay Phulari, Jyoti Jadhav, Prof. Rajendra Kakade) या अंतिम पाच उमेदवारांमधून एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार होती. अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा बहुमान डॉ. विजय फुलारी, यांना मिळाला.सुमारे 20  दिवसांनंतर कुलगुरू पदाच्या निवडीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये काही वादग्रस्त व्यक्तीची नावे मुळाखातीच्या निवड यादीत आली होती.त्यावरून उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या.त्यानंतर अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती मुलाखती १९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता घेतल्या जाणार होत्या. मात्र,त्या काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या होत्या.त्यानंतर 4 जानेवारी रोजी दुपारी 4 ते 5.30 या कालावाधीत अंतिम मुलाखती झाल्या. त्यातून डॉ. विजय फुलारी,यांची कुलगुरू पदी निवड करण्यात आली.