ASER 2023 Report news : असरचा रिपोर्ट जाहीर : युवकांना वाचायला अन् गणित सोडवायला येईना; सर्वाधिक विद्यार्थी घेतायेत कला शाखेत शिक्षण

सर्वेक्षण अहवालानुसार केवळ 5.6% युवक व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत किंवा त्या संदर्भातील इतर अभ्यासक्रम करत आहेत.

ASER 2023 Report news : असरचा  रिपोर्ट जाहीर : युवकांना वाचायला अन् गणित सोडवायला येईना; सर्वाधिक विद्यार्थी घेतायेत  कला शाखेत  शिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट अर्थात असरचा (Annual Status of Education Report -ASER-2023 ) रिपोर्ट जाहीर झाला असून त्यात शिक्षण विषयक अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.असरने 2023 चा 'बियॉन्ड बेसिक्स'चा (Beyond Basics)रिपोर्ट प्रसिद्ध केला असून भारतातील ग्रामीण भागामधील 14 ते 18 वर्ष युवकांवर लक्ष केंद्रित करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षण अहवालानुसार केवळ 5.6% युवक व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत किंवा त्या संदर्भातील इतर अभ्यासक्रम करत आहेत. त्यातही अनेक युवक कमी कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. शिक्षण घेत असताना 15  दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत काम करणाऱ्या मुला मुलींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे, असे काही मुख्य निष्कर्ष या रिपोर्टमधून बाहेर आले आहेत.

असर संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय शिक्षण आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची स्थिती या संदर्भातील अहवाल तयार केला जातो. 2005 पासून सुरू झालेल्या या अहवालानुसार अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2023 च्या अहवालामध्ये भारतीय युवक वर्तमानात कालावधीत काय करत आहे. त्यांना वाचन, गणित करणे आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करता येतो का?, या युवकांकडे असणाऱ्या स्मार्टफोनचा वापर ते कोणत्या गोष्टीसाठी करतात, बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. देशभरातील 26 राज्यांमधील 28 जिल्ह्यातील 14 ते 18 वर्षे वयोगटातील 34 हजार 745 तरुणांशी संवाद साधून हा अहवला तयार करण्यात आला. त्यात प्रत्येक राज्यांमधील एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण केले गेले. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांची निवड सर्वेक्षणासाठी करण्यात आली होती.

हेही वाचा : विद्यापीठे म्हणजे नुसत्या उंच उंच मनोराच्या आकर्षक इमारती नव्हेत...

असरच्या अहवालात धक्कादायक माहिती 
* वय वर्ष 14 ते 18 वयोगटातील सुमारे पंचवीस टक्के युवकांना आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता येत नसल्याचे समोर आले.
अर्ध्यापेक्षा जास्त युवक तीन ते एक अंकापर्यंतच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ 43% युवकांनी बरोबर उत्तरे दिली.  इयत्ता तिसरी ते चौथी च्या वर्गातील प्रश्नांवर या युवकांशी संवाद साधण्यात आला.

* अर्ध्यापेक्षा अधिक युवकांनी (57.3)इंग्रजी भाषेतील वाक्य वाचली. परंतु,त्यातील तीन चतुर्थांश युवकांना त्याचा अर्थ सांगता आला. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचत असल्याचे दिसून आले. मात्र, गणित आणि इंग्रजी मध्ये मुलींच्या तुलनेत मुले अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असल्याचे दिसून आले.

सर्वेक्षणानुसार 14 ते 18 वर्ष वयोगटातील 86.6% युवक कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातही मुला-मुलींच्या शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अंतर दिसून आले. 14 वर्षे वयातील 3.9% युवक आणि अठरा वर्षाचे 32.6% युवक शिक्षण घेत नसल्याचे दिसून आले. त्यातही बहुतांश विद्यार्थी हे कला शाखेतील शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीच्या पुढील 55.7% युवक हे कला शाखेचे शिक्षण घेत असून त्यात मुलींचे प्रमाण 28.1% तर मुलांचे प्रमाण 36. 3% एवढे आहे.


 डिजिटल जागृत आणि कौशल्य 
सर्वेक्षण अहवालानुसार 90% युवकांच्या घरी स्मार्टफोन आहे. त्यातील सर्व युवक स्मार्टफोनचा वापर करू शकतात. त्यातही मुलींच्या तुलनेत दुप्पट मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे सुमारे 80 टक्के युवकांनी केवळ चित्रपट पाहण्यासाठी गाणे ऐकण्यासाठी म्हणजेच मनोरंजनासाठी स्मार्टफोनचा उपयोग केल्याचे सांगितले.