सूरजच्या जिद्दीला सलाम; दोन्ही हात नसूनही सर्वसामान्यांप्रमाणे सोडवला पेपर; पायाने लिहिली उत्तरे 

दोन्ही हात नसताना पायाने सुंदर व स्वच्छ अक्षरात जवळपास 13 पानी पेपर सूरजने सोडविला.त्याच्या या जिद्दीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

सूरजच्या जिद्दीला सलाम; दोन्ही हात नसूनही सर्वसामान्यांप्रमाणे सोडवला पेपर; पायाने लिहिली उत्तरे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दिव्यांग विद्यार्थ्यांना (Disabled students)सर्व परीक्षांसाठी लेखनिक किंवा पेपर सोडवण्यासाठी अधिकाचा वेळ दिला जातो.मात्र, दोन्ही हात नसताना (Without both hands)सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सूरज (Suraj of Malshiras taluka of Solapur district)या एका दिव्यांग विद्यार्थ्याने नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर स्वतः मुक्त विद्यापीठाचे (Open University)पेपर लिहिण्याची तयारी दाखवली. एवढेच नाही तर त्याने पायाने सुंदर व स्वच्छ अक्षरात (beautiful and clean letter with a foot)जवळपास 13 पानी पेपर सोडविला.त्याच्या या जिद्दीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

सूरज शब्बीर मुजावर असे पायाने पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सूरजने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्र अंतर्गत प्रथम वर्ष बीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे.सूरजने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीराम शिक्षण महाविद्यालय पाणीव या अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतला असून तो दुष्काळी भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. सूरज जन्मतः अपंग असून इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.

सूरजला अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्र संयोजक यांनी विद्यापीठ नियमाप्रमाणे लेखनिक, वेळ वाढवून देणे किंवा वेगळा परीक्षा वर्ग देणे या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली . मात्र, त्याने नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर स्वतः पेपर लिहिणे पसंत केले.

मुक्त विद्यापीठामुळे माझे उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होत आहे, याचा मला मनस्वी होत, आहे अशा भावना त्याने व्यक्त केल्या.सूरजने बुधवारी त्याचा बीए अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर दिला. सुरज यांच्या जिद्दीबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू,प्र कुलगुरू, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार पुणे, कुलसचिव व परीक्षा नियंत्रक यांनी कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.