CET Cell : सीईटी सेलकडून CET 2024 च्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर

पीसीएम/पीसीबी, बीए/बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी ५ वर्ष, बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी २०२४ परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

CET Cell : सीईटी सेलकडून  CET 2024 च्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

CET Cell results : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) करीता घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर (Probable dates for exam results announced) करण्यात आल्या आहेत. पीसीएम/पीसीबी, बीए/बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी ५ वर्ष, बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी २०२४ परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा सीईटी सेलकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

एमएचटी सीईटी  पीसीएम/पीसीबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख १० जून आहे. बीएचएमसीटी ११ जून, बीए/बीएस्सी बी.एड सीईटी १२ जून, डीपीएन/एचपीएन १२ जून, एमएचएमसीटी सीईटी १३ जून, नर्सिंग १६ जून, एलएलबी ५ वर्ष सीईटी १६ जून आणि बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी १७ जून २०२४ रोजी प्रवेश अभ्यासक्रम परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. 

वरील सर्व परीक्षांचे निकाल सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळ  https://www.mahacet.org  वर प्रसिद्ध करण्यात येईल. यादी उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे CET Cell कडून सुचना पत्रात नमुद करण्यात आले आहे.