सातासमुद्रापार शिक्षणात मुलींचाही झेंडा; मुलांच्या बरोबरीने घेतायेत झेप

परदेशात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांमधील पुरुष-महिला विद्यार्थी गुणोत्तर २०२२ मध्ये मेट्रो शहरांमध्ये ५०:५० पर्यंत वाढले आहे. २०१९ मध्ये ७०:३० होते.

सातासमुद्रापार शिक्षणात मुलींचाही झेंडा; मुलांच्या बरोबरीने घेतायेत झेप
Indian girls going abroad for education has increased

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

परदेशी शिक्षण (Education in Abroad) जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मुलींची (Indian Girl Students) वाढ झपाट्याने होत आहे. कोरोना (Covid 19) नंतर देशाबाहेर उच्च शिक्षणासाठी (Higher Education) जाणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे फक्त शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागातूनही मुली परदेशात शिक्षणासाठी जात आहेत, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. (Indian girls going abroad for education has increased)    

२०२२ मध्ये परदेशात शिक्षण घेण्यासाठी महिला अर्जदारांच्या संख्येत १०० ते १५० टक्के वाढ झाली आहे. पुढील वर्षांतही हा कल कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परदेशी शिक्षण सल्लागार आणि विद्यार्थी कर्ज पुरवठादारांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांमधील पुरुष-महिला विद्यार्थी गुणोत्तर २०२२ मध्ये मेट्रो शहरांमध्ये ५०:५० पर्यंत वाढले आहे. २०१९ मध्ये ७०:३० होते. तर छोट्या शहरांमध्ये हे प्रमाण ८०:२० वरून ५५:४५ पर्यंत सुधारले. २०२० पूर्वी, एकूण अर्जदारांपैकी फक्त २१ टक्के मुली परदेशात शिक्षणासाठी जात होत्या. आता हे प्रमाण ४९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

Education Loan : वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घ्या... राज्य सरकार भरेल व्याज!

याविषयी 'एज्युवार्ता' शी बोलताना शिक्षण तज्ज्ञ हरीश बुटले (Harish Butle) म्हणाले, "भारतात आणि जागतिक स्तरावर मोठ-मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवाय विशेष करून महिलांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचा फायदा भारतीय विद्यार्थिनींना होत आहे.

'दिलीप ओक' अकॅडमीचे प्रमुख दिलीप ओक (Dilip Oak) म्हणाले, "आता पालकांची मानसिकता बदलत आहे. पालक जागरूक झाले आहेत. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही शिक्षणाची समान संधी देतात. शिवाय आता आर्थिक स्तर उंचावल्यामुळे आणि बँकाकडून शिक्षणासाठीचे विविध कर्ज मिळत असल्यामुळे मुलींचे परदेशी शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा बरेच वाढले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo