विद्यार्थ्यांना स्वच्छ आहाराचे धडे, शालेय पोषणात मात्र मेलेल्या उंदराचे हाडे! अकोल्यात धक्कादायक प्रकार

अकोला शहरातील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले आहेत. यामुळे १० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

विद्यार्थ्यांना स्वच्छ आहाराचे धडे, शालेय पोषणात मात्र मेलेल्या उंदराचे हाडे! अकोल्यात धक्कादायक प्रकार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अकोला शहरातील (Akola City) मनपा शाळेत विद्यार्थ्यांना (Students in Municipal School) शालेय पोषण आहारातून (School nutrition food) विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष (The remains of a dead mouse) सापडले आहेत. यामुळे १० विद्यार्थ्यांना विषबाधा (10 students poisoned) झाल्याची माहिती असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

अकोला येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २६ मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर शाळेतील १० विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा फार मोठा हलगर्जीपणा असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्याचा प्रकार आहे. यावर पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभाग या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई करणार? हे पाहावे लागणार आहे.

मनपा शाळेत पोषणात आहारात नेहणीप्रमाणे खिचडी दिली जाते. खिचडी खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलटी होणे, मळमळ होणे,  असे त्रास होऊ लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहारात मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये मृत उंदराचे अवशेष सापडले आहेत. हीच खिचडी या विद्यार्थ्यांच्या खाण्यात आली होती, ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. या सर्व गोष्टीमुळे प्रशासनाचा बेभरवशी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.