मुंबई विद्यापीठाच्या ८ ऑगस्ट रोजी होणार्‍या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा, ज्यात कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण आणि फार्मसी विद्याशाखांच्या परीक्षा तसेच सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (CDOE) (पूर्वीचे आयडॉल) च्या परीक्षांचा समावेश आहे, या सर्व परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ८ ऑगस्ट रोजी होणार्‍या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या (Changes in exam schedule) आहेत. नारळी पौर्णिमेमुळे सार्वजनिक सुट्टी (Narli Pornima Public Holiday) असल्याने, विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, ८ ऑगस्ट रोजी नियोजित असलेल्या परीक्षा आता होणार नाहीत. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर (New schedule will be announced) केले जाईल, असे विद्यापीठाने कळवले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा, ज्यात कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण आणि फार्मसी विद्याशाखांच्या परीक्षा तसेच सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (CDOE) (पूर्वीचे आयडॉल) च्या परीक्षांचा समावेश आहे, या सर्व परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

"कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण आणि फार्मसी या संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य आणि दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक (CDOE) यांना कळविण्यात येते की, स्थानिक सुट्टी (नारळी पोर्णिमा) यामुळे ८ ऑगस्ट रोजीच्या परीक्षा वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. तसेच सुधारित तारख लवकरच जाहीर केली जाईल, असे कळवण्यात आले आहे.

" संलग्न महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना त्यानुसार माहिती द्यावी, सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल," असे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत X हँडलवरून X वर पोस्ट केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.