'पॅट' प्रश्नपत्रिका फुटली; शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर तसेच त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता प्रसारित करून शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केले, त्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'पॅट' प्रश्नपत्रिका फुटली; शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षण विभागाच्या स्टार्स उपक्रमाअंतर्गत (STARS activities) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) 2025-26 साठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी (PAT) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटली (question paper was leaked) असून प्रश्नपत्रिका कशी सोडवावी या संदर्भातील व्हिडिओ एका अज्ञात यु ट्यूब चॅनेल धारकाने चांगलाच व्हायरल केला आहे. त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आले की, अज्ञात यु ट्यूब चॅनेल धारक यांचे विरुध्द महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर तसेच त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता प्रसारित करून शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केले, त्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भान्यासं क २२३. ३(५) महा विद्यापिठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५. ६ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम यानुसार अज्ञात यु ट्यूब चॅनेल धारक यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.