दिशाभूल करणाऱ्या विद्यापीठ आणि काॅलेजपासून सावध रहा; UGC च्या विद्यार्थ्यांना सुचना 

एमबीए च्या १० विद्यार्थ्यांची फसवणूक (10 MBA students cheated) झाल्याचे युजीसीच्या निदर्शनास आले आहे.

दिशाभूल करणाऱ्या विद्यापीठ आणि काॅलेजपासून सावध रहा; UGC च्या विद्यार्थ्यांना सुचना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही व्यक्ती आणि संस्था उच्च शिक्षण प्रणालीच्या (Higher education system) मान्यताप्राप्त पदवी कार्यक्रमांप्रमाणे संक्षिप्त फॉर्मसह ऑनलाइन कोर्स ऑफर (Online course offering) करत आहेत. या फसव्या कार्यक्रमामध्ये एमबीए च्या १० विद्यार्थ्यांची फसवणूक (10 MBA students cheated) झाल्याचे युजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार पुढील काळात कोणाची फसवणूक होवू नये या उद्देशाने युजीसीने सूचना प्रसिद्ध केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर अधिकृत राजपत्रातील औपचारिक अधिसूचनेद्वारे पदवी नामांकन, कालावधी आणि प्रवेश पात्रता स्थापित करतो. केवळ केंद्रीय, प्रांतीय किंवा राज्य कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठे, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि संसद कायद्याद्वारे अधिकार प्राप्त विद्यापीठे यांनाच या पदव्या प्रदान करण्याचा अधिकार आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

UGC नियमांनुसार कोणताही ऑनलाइन पदवी कार्यक्रम ऑफर करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना UGC कडून मान्यता घेणे देखील आवश्यक आहे. ऑनलाइन प्रोग्राम ऑफर करण्यासाठी मान्यताप्राप्त HEls ची सूची आणि परवानगी असलेल्या ऑनलाइन प्रोग्राम्सची नावे युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्ही यामध्ये सहभागी होणार असाल तर कोणत्याही ऑनलाइन प्रोग्राममध्ये अर्ज करण्यापूर्वी किंवा प्रवेश घेण्यापूर्वी ऑनलाइन प्रोग्रामची वैधता तपासण्याचा सल्ला युजीसीकडून देण्यात आला आहे. 

 “उच्च शिक्षण संस्थांना UGC नियमांनुसार कोणताही ऑनलाइन पदवी कार्यक्रम ऑफर करण्यासाठी UGC कडून मान्यता घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रोग्राम ऑफर करण्यासाठी मान्यताप्राप्त HEI (उच्च शिक्षण संस्था) ची यादी deb.ugc.ac.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या यादीत समाविष्ठ असलेल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयाला ऑनलाइन प्रोग्रामची परवानगी देण्यात आली आहे.