‘चॅटबॉट’द्वारे घेतली जाणार विद्यार्थ्यांची हजेरी; एक डिसेंबरपासून ऑनलाईन नोंद

चॅटबॉट वापरासंबंधीचे प्रशिक्षण पुण्यातील विद्या समीक्षा केंद्रामार्फत विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना देण्यात आले आहे.

‘चॅटबॉट’द्वारे घेतली जाणार विद्यार्थ्यांची हजेरी; एक डिसेंबरपासून ऑनलाईन नोंद
ChatBot

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील (Grantable Schools) इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत्या विद्यार्थ्यांची (School Students) आता ऑनलाईन हजेरी (Online Attendance) घेतली जाणार आहे. स्विफ्टचॅट या अॅपमधील अटेंडन्स बॉट (चॅटबॉट) द्वारे ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जाणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. (ChatBot)

 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून (Maharashtra Primary Education Council) याबाबत राज्यभरातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या आहेत. चॅटबॉट वापरासंबंधीचे प्रशिक्षण पुण्यातील विद्या समीक्षा केंद्रामार्फत विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना देण्यात आले आहे. त्यानुसार ही प्रक्रिया प्रत्यक्षात दि. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत परिषदेरकडून महत्वाच्या मार्गदर्शक सुचनाही देण्यात आल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 'एनएसएस'चा विश्वविक्रम; तब्बल १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फीची 'गिनीज'मध्ये नोंद

 

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना

 

१. गुगल प्ले स्टोअर वरून स्विफ्ट चॅट हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावे.

 

२. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार SwihChat या Application मधील Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

 

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वत:च्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.

 

४. शिक्षकानी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

 

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bot वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

 

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाच्या शालार्थ आयडीद्वारे नोंदविण्यात यावी.

 

७. काही शिक्षकांना Attendance Bot द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.

 

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

 

९. या Attendance Bot वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७ ते दु.१२ तर अन्य शाळांसाठी सकाळी १० ते सायं. ५ या कालावधीत विद्याथ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी.

 

१०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा है विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती Attendance Bot वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

 

११. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/ AttendanceBot या लिंकवर सादर कराव्यात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO