आशा व गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर आश्वासनपूर्तीसाठी आंदोलन 

महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे आंदोलन सुरू

आशा व गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर आश्वासनपूर्तीसाठी आंदोलन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 Asha Tais protest : महाराष्ट्रातील हजारो आशा व गटप्रवर्तक ताईंनी शासनाने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करावी , मानधन वाढीचा शासन निर्णय प्रसिध्द करावा या मागणीसाठी शहापूर ते मुंबई लॉंग मार्च काढला. ठाण्यात दोन दिवस मुक्काम करून 11 तारखेपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनास चौथा दिवस झाले तरीही शासनाकडून त्यांची दाखल घेलली गेली नाही.मात्र,ज्या दिवशी शासन निर्णय हातात मिळेल त्याच दिवशी आम्ही माघार घेऊन घरी जाऊ असा ठाम निर्धार केला असल्याचे महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य खात्यातील आशा गटप्रर्वतक सरकारच्या शासन निर्णयाची वाट पाहत आहे. 9 तारखेला मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक प्रति समिती बरोबर वीस मिनिट बैठक झाली. बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी येत्या कॅबिनेट मंत्री मंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यात निर्णयाला किमान दहा दिवसाचा वेळ मागितला. परंतु महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक अत्यंत संतापलेल्या आहेत. कारण तीन महिन्यापूर्वी आंदोलन केलं तेव्हा सरकारच्या शब्दावर घोषणेवर विश्वास ठेवून संप मागे घेतला. परंतु तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही शासकीय आदेश निघाला नसल्याने आशा व गटप्रवर्तकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. त्यामुळे आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील आशा आंदोलन करत आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व  कॉ.डी.एल कराड, कॉ.एम एच शेख, कॉ. के आर रघु, कॉ. आरमायटी इराणी, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. अर्चना घुगरे , कॉ. हनुमंत कोळी,  कॉ. राजेंद्र साठे , कॉ. सिद्धाराम उमराणी या करत आहेत.