स्कॉलरशीप परीक्षेसाठी 6 हजार 183 परीक्षा केंद्र सज्ज ; १८ फेब्रुवारीला परीक्षा

शासन स्तरवर सर्व तयारी पुर्ण झाली असून शाळेकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र वाटप करण्यात आले आहेत.

स्कॉलरशीप  परीक्षेसाठी 6 हजार 183 परीक्षा केंद्र सज्ज ;  १८  फेब्रुवारीला परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची (Scholarship Examination) तयारी पूर्ण झाली असून राज्यातील 6 हजार 183 परीक्षा केंद्रांवर ((Examination Centre) 8 लाख 91 हजार 700  विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यात पाचवीच्या 5 लाख 10 हजार 378  तर आठवीच्या 3 लाख 81 हजार 332 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.येत्या 18 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर एकाचवेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे,असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे (Maharashtra State Examination Council Chairman Nand Kumar Bedse) यांनी सांगितले.

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन शिष्यवृत्ती देण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 1954- 55 या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.यंदा राज्यातील 77 हजार 740 शाळांमधील 5 लाख 10 हजार 378 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांची परीक्षा 3 हजार 614 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. तसेच इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी 28 हजार 504 शाळांमधील 3 लाख 81 हजार 322  विद्यार्थी परीक्षा देणार असून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी 2 हजार 569 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
इयत्ता पाचवीसाठी 16 हजार 693 शिष्यवृत्ती संच मंजूर आहेत. तर इयत्ता आठवीसाठी 16 हजार 588 संच मंजूर आहेत. आठवीसाठी दरमहा 750 रुपये शिष्यवृत्ती तर पाचवीसाठी दरमहा 500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे या परीक्षेचे हॉल तिकीट 2 फेब्रुवारीपासून शाळेच्या लाॅगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. विद्यार्थींनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडून हॉल तिकीट  प्राप्त करुन घ्यावे, आशा सूचना परीक्षा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.