छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू
जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार येत्या 18 जानेवारी म्हणजे उद्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र संचालनालय (Maharashtra Directorate) छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत 'कनिष्ठ लेखापाल' पदांच्या 42 जागांसाठी (Recruitment for 42 Junior Accountant Posts) भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार येत्या 18 जानेवारी म्हणजे उद्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Recruitment process begins) मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://mahakosh.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 19 वर्षे पूर्ण केलेले असणे अपेक्षित आहे. तर कमाल वयोमर्यादा ३५ असावी. भरती नियमानुसार ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे तर मागासवर्गीय आणि इतरांना ५ वर्षाची सूट असणार आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 1 हजार तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
शैक्षणिक अर्हता -
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.