धक्कादायक: कॅनडात गेलेले तब्बल वीस हजार भारतीय विद्यार्थी विद्यापीठातून बेपत्ता!
IRCC नुसार, मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये कॅनेडियन महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सुमारे ५०,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना 'नो-शो' म्हणून नोंदवण्यात आले होते, त्यापैकी २०,००० विद्यार्थी भारतीय होते. ही संख्या एकूण भारतीय विद्यार्थ्यांच्या ५.४ टक्के आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटीझनशिप कॅनडा' (Immigration, Refugees and Citizenship Canada) IRCC नुसार, मार्च आणि एप्रिल २०२४ मध्ये कॅनेडियन महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सुमारे पन्नास हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना 'नो-शो' (अनुपस्थित) म्हणून नोंदवण्यात आले होते, त्यापैकी वीस हजार विद्यार्थी भारतीय होते. ही संख्या एकूण भारतीय विद्यार्थ्यांच्या ५.४ टक्के आहे. आयआरसीसीच्या मते, हे सर्व आकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अनुपालन प्रणाली अंतर्गत गोळा केले गेले आहेत, ज्या अंतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांना अभ्यास परवान्याच्या अंमलबाजवणीची खात्री करण्यासाठी अहवाल द्यावा लागतो.
भारतीय कायदा अंमलबजावणी संस्था या प्रकरणाची चौकशी करत आहेत. कॅनेडियन महाविद्यालये आणि भारतातील संस्थांमधील कथित बेकायदेशीर घडामोडींची देखील चौकशी केली जात आहे.
दरम्यान, कॅनडा सरकारने अभ्यास व्हिसाचे नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. आता जर विद्यार्थ्याला कॉलेज बदलायचे असेल तर त्याला नवीन अभ्यास व्हिसा घ्यावा लागेल आणि जर व्हिसा नाकारला गेला तर त्याला ३० दिवसांच्या आत कॅनडा सोडावे लागेल. याव्यतिरिक्त, स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS) व्हिसा प्रक्रिया नोव्हेंबर २०२४ मध्ये बंद झाले आहे, ज्यामुळे नॉन-SDS मार्गाखाली व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे.