ICMR-NIN इंटर्नशिप प्रशिक्षण २०२४ साठी अर्ज सुरु, 'ही' अंतिम तारीख 

अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जूनपर्यंत देण्यात आली आहे. 

ICMR-NIN इंटर्नशिप प्रशिक्षण २०२४ साठी अर्ज सुरु, 'ही' अंतिम तारीख 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन  (ICMR-NIN) कडून जुलै ते डिसेंबर दरम्यान चालू वर्षासाठी इंटर्नशिप प्रशिक्षण (Internship training) दिले जाणार आहे. त्यासाठी 1 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरु (Application process starts from May 1) करण्यात आली आहे. ICMR-NIN चे अधिकृत संकेतस्थळ www.nin.res.in वर ऑनलाईन मोडमध्ये अर्ज स्विकारले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जूनपर्यंत देण्यात आली आहे. 

लाइफ सायन्सेस/सोशल सायन्सेस/अलाईड सायन्सेस किंवा त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित अंतिम वर्ष/सेमिस्टर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्साही असलेल्या विद्यापीठे/महाविद्यालयांमधील व्यावसायिक पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थी अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे पहिल्या वर्षाच्या किंवा शेवटच्या सेमिस्टरच्या गुणांच्या यादीनुसार चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. केवळ त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून प्रबंध किंवा इंटर्नशिप करण्याची शैक्षणिक आवश्यकता असलेल्या पदवीचा पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांची भरती केली जाईल, असे नमुद करण्यात आले आहे. 

प्रकल्प कार्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क म्हणून ३ हजार आणि प्रकल्प शुल्क १ हजार रूपये प्रवेशाच्या वेळी भरायचे आहेत. प्रकल्पाच्या पूर्ण कालावधीसाठी प्रति महिना आगाऊ १ हजार रुपये भरायचे आहेत, हे शुल्क केवळ ऑनलाइन हस्तांतरण मोडद्वारे स्विकारले जाणार आहेत. उमेदवाराने ICMR-NIN मध्ये सामील झाल्याच्या दिवशी शुल्क भरणे आवश्यक आहे, असे देखील नमुद करण्यात आले आहे. 

दुसरे सत्र पुढील वर्षाच्या जानेवारी ते जून दरम्यान सुरु होईल. त्यासाठी चालू वर्षाच्या 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरु होईल. जुलै-डिसेंबर 2024 सत्रासाठी प्रबंध/इंटर्नशिप अर्ज प्रक्रिया 1 मे पासून सुरु झाली आहे. या सत्रासाठीचे अर्ज 15 जूनपर्यंत स्वीकारले जातील.