दिल्ली-नोएडातील 50-60 शाळांना धमकीचे ईमेल,पोलिसांची शोध मोहीम सुरू

यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. धमकी प्रकरणातनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

दिल्ली-नोएडातील  50-60 शाळांना धमकीचे ईमेल,पोलिसांची शोध मोहीम सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दिल्ली आणि नोएडा येथील विविध ५० ते ६० शाळांना (Delhi School Bomb Blast Threat) बॉम्ब स्फोटने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. शाळांना धमकीचे ईमेलद्वारे (Threatening emails to schools) पाठवण्यात आले आहेत. त्यावर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) शाळांमध्ये चौकशी केली जात असून आतापर्यंत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा शाळांच्या परिसरात तैनात करण्यात आली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. धमकी प्रकरणातनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.    

दिल्ली पब्लिक स्कूल, मदर मैरी, संस्कृती स्कूल, वसंत कुंज येथील डीपीएस, साकेत येथील एमिटी स्कुल, दिल्ली, द्वारका आणि नोएडामधील जवळपास 50 ते 60 शाळांना धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहित समोर आली आहे. द्वारका आणि  अशोक विहार मधील प्रूडेन्स स्कूलला देखील धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी काही शाळांना धमकी दिल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार कालपासून आजपर्यंत काही शाळांना धमकीचे मेल करण्यात आले आहेत. मेलमध्ये डेटलाईनचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. मेलमध्ये बीसीसी असून यामुळे एकच मेल अनेक ठिकाणी गेला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अशा प्रकारचे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने एकच मेल एकाच वेळी अनेक खासगी तसेच सरकारी संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले आहे, असेही या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. धमकीच्या चर्चेनंतर रुग्णालयातही शोधमोहीम राबवण्यात आली. पण कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. धमकीचे मेल आले असले तरी त्या धमक्यांत काहीही तथ्य नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.