युनेस्को कडून 41 लाख रुपयांच्या महिला शिक्षण पुरस्कारासाठी मागवले अर्ज

भारतातील उच्च शिक्षण संस्थांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत भारतीय राष्ट्रीय आयोगाकडे अर्ज पाठवावे.

युनेस्को कडून 41 लाख रुपयांच्या महिला शिक्षण पुरस्कारासाठी मागवले अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) कडून  सध्या महिला शिक्षण पुरस्कार 2024 (Women Education Award 2024) साठी अर्ज मागवले जात आहेत. भारतातील उच्च शिक्षण संस्थांना (Higher Education Institutions in India) 41 लाख रुपयांच्या या महिला शिक्षण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

भारतातील उच्च शिक्षण संस्थांना (HEIs) विनंती करण्यात आली आहे की त्यांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत भारतीय राष्ट्रीय आयोगाकडे (INCCU) अर्ज पाठवावे. INCCU 24 मे 2024 पर्यंत शिफारस केलेले अर्ज UNESCO कडे पाठवेल. युनेस्को कार्यकारी मंडळ, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना च्या सहकार्याने, 2024 पुरस्कारासाठी दोन विजेते निवडेल. प्रत्येक विजेत्याला US$50,000 (रु. 41,65,000) बक्षीस दिले जाईल. केंद्र  सरकार पुरस्कारासाठी तीन नामांकने पाठवू  शकतात.

ज्या व्यक्तींनी महिला शिक्षणासाठी भरीव योगदान दिले आहे. ज्यांनी महिला शिक्षणाच्या अनुषंगणाने किमान दोन वर्ष एखादा प्रकल्प राबवत असतील, अशा व्यक्ती पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. नामांकने  24 मे 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत https://www.unesco.org/qwe येथे इंग्रजी किंवा फ्रेंचमध्ये सबमिट करणे आवश्यक आहे. इच्छूक उमेदवार  अधिक माहितीसाठी https://www.unesco.org/qweGWEPrize@unesco.org या वेबसाईटला भेट देऊ शकतात.