व्यवस्थापन परिषद सदस्याकडून कुलगुरूंना ससा- कासवाचे चित्र भेट

महत्त्वाच्या प्रश्नांना प्रशासनाकडून संथ गतीने प्रतिसाद मिळत असल्याने एका व्यवस्थापन परिषद सदस्याने थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना ससा व कासवाचे चित्र भेट दिले. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळत असलेल्या संथगतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

व्यवस्थापन परिषद सदस्याकडून कुलगुरूंना ससा- कासवाचे चित्र भेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)व्यवस्थापन परिषदेमध्ये विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी (Member of the Management Council)प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना प्रशासनाकडून संथ गतीने प्रतिसाद मिळत असल्याने एका व्यवस्थापन परिषद सदस्याने थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांना ससा व कासवाचे चित्र (The hare and the tortoise picture)भेट दिले. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळत असलेल्या संथगतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विविध विभागांसह प्रमुख प्रशासकीय व शैक्षणिक अधिकारी पदांवर प्रभारी व्यक्ती कामकाज पाहत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. विद्यापीठ आवारात जागा असूनही विद्यार्थ्यांसाठी पर्यंत वसतिगृहाची व्यवस्था करण्यात विद्यापीठ अपयशी ठरत आहे. वसतिगृहाचा प्रश्न कासवगतीने सोडवला जात आहे. विद्यापीठाच्या उपकेंद्रांचा विषय प्रलंबित असून विद्यापीठाच्या इस्टेट विभागात कार्यकारी अभियंता पदी संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली नाही. स्थानिक व उपकेंद्राचे प्रश्न सोडवणे गरजेचे असताना परदेशात कॅम्पस उभे करण्यावर अधिक लक्ष दिले जात आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी नियमानुसार कार्यवाही होणे अपेक्षित असताना सुरक्षे संदर्भातील निविदा प्रक्रियेला गती दिली जात नाही.

विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य म्हणाले, विद्यापीठ प्रशासनाकडून काही ठराविक लोकांच्या हिताच्या विषयांना सशाच्या गतीने मंजुरी दिली जाते. मात्र, विद्यापीठ आणि विद्यार्थी हिताच्या विषयांना कासव गती दाखविली जाते. विद्यापीठ प्रशासनाकडे इच्छा शक्तीचा अभाव असल्यामुळे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत.त्यामुळे कुलगुरू यांना प्रतिकात्मक चित्र भेट दिले.