बार्टी शिष्यवृत्ती : नीट, जेईई शिकवणी अर्जासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
या लाभासाठी बार्टीच्या संकेतस्थळावर ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असून असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांकडून प्रवेशाचे प्रमाणपत्र (बोनाफाईड) न मिळाल्याने विद्यार्थ्यांना बार्टीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्यावतीने मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी (Medical and Engineering Admissions) घेण्यात येणाऱ्या नीट व जेईई स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम (Training program for competitive exams) राबविला जातो. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठीच्या अर्ज प्रक्रियेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ (Application process extended till August 10th) देण्यात आली आहे.
अभियांत्रिकीच्या पहिल्या यादीत १.४ लाख विद्यार्थ्यांची निवड, प्रवेश मात्र ३२ हजार
बार्टीतर्फे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षांच्या तयारीसाठी अनुदान देण्यात येते. नुकतीच राज्य शिक्षण मंडळ व सीबीएसईचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेमध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हे अनुदान देण्यात येते. या लाभासाठी बार्टीच्या संकेतस्थळावर ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असून असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांकडून प्रवेशाचे प्रमाणपत्र (बोनाफाईड) न मिळाल्याने विद्यार्थ्यांना बार्टीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
बार्टीतर्फे नव्याने परिपत्रक काढून प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रियेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले. हे प्रशिक्षण २०२५ ते मे २०२७ या काळापर्यंत असेल. सर्व जिल्ह्यातील १० वी सीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम समुदायातील विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईईचे मोफत प्रशिक्षण घेण्याची विशेष संधी देण्यात आली आहे. लाखो रुपयांचे शुल्क न भरता अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे मार्फत नीट व जेईईच्या उत्कृष्ट कोचिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोचिंगसह या विद्यार्थ्यांना दरमहा ६००० रुपये याप्रमाणे दोन वर्षाकरीता विद्यावेतन देण्यात येणार आहे. सोबत पुस्तकांसाठी ५००० रुपयेसुद्धा मिळणार आहेत. यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे
eduvarta@gmail.com