नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ!

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत बसण्यासाठी, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. तर सर्व श्रेणीतील अनुसूचित जाती, जमाती, पीएच आणि महिला उमेदवार मोफत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायची आहेत.

नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. (The last date to apply for Civil Services Mains Examination 2025 has been extended.) अधिसूचनेनुसार, यूपीएससीने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पूर्वी ११ फेब्रुवारी २०२५ निश्चित केली होती, जी १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या upsconline.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. १९ फेब्रुवारी रोजी दुरुस्ती विंडो उघडली जाईल, जी २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत खुली राहील.

UPSC CSE अर्ज भरण्यासाठी, तुम्हाला प्रथम पोर्टलवर जावे लागेल आणि वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) करावे लागेल. यानंतर, उमेदवारांनी इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटी, उमेदवारांनी विहित शुल्क भरावे आणि पूर्णपणे भरलेला फॉर्म सादर करावा. यानंतर, उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट घ्यावी. 

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत बसण्यासाठी, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. तर सर्व श्रेणीतील अनुसूचित जाती, जमाती, पीएच आणि महिला उमेदवार मोफत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायची आहेत. आयएएस/आयएफएस पूर्व परीक्षा यूपीएससी द्वारे २५ मे २०२५ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.