UGC NET परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ ; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
जून २०२५ च्या यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज शुल्क श्रेणीनुसार वेगळ्या पद्धतीने निश्चित केले आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना १ हजार १५० रुपये, ईडब्ल्यूएस/ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) यांना ६०० रुपये, तर एससी/एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना ३२५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ई-चलानद्वारे भरता येईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत) निश्चित करण्यात आली आहे, तर परीक्षा शुल्क १३ मे २०२५ रात्री ११:५९ पर्यंत भरता येईल. उमेदवारांना त्यांचा अर्ज दुरुस्त करण्यासाठी १४ ते १५ मे २०२५ पर्यंत वेळ मिळेल. शिवाय, यूजीसी नेट जून २०२५ परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा २१ जून ते ३० जून २०२५ दरम्यान निश्चित करण्यात आहेत, ज्यामध्ये ही परीक्षा घेतली जाईल.
जून २०२५ च्या यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज शुल्क श्रेणीनुसार वेगळ्या पद्धतीने निश्चित केले आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना १ हजार १५० रुपये, ईडब्ल्यूएस/ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) यांना ६०० रुपये, तर एससी/एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना ३२५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ई-चलानद्वारे भरता येईल.
परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. राखीव प्रवर्गाला नियमांनुसार सवलत दिली जाईल. पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षात असलेले किंवा ज्यांचा निकाल प्रलंबित आहे असे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय, नवीन शिक्षण धोरण २०२० अंतर्गत, आता ४ वर्षांची पदवीधर पदवी असलेले उमेदवार देखील UGC NET परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी कमाल वयोमर्यादा 31 वर्षे आहे, तर NET साठी कोणतीही वयोमर्यादा नाही. नियमांनुसार पात्र श्रेणींना वयात सूट देखील दिली जाईल.