सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परदेशात कॅम्पस ? 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परदेशात कॅम्पस सुरू करावेत, भूमिका विद्यापीठाच्या रविवारी झालेल्या अधिसभेत काही सदस्यांनी मांडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परदेशात कॅम्पस  ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Savitribai Phule Pune University) नावलौकिक केवळ देशातच नाही तर परदेशातही (abroad) आहे.काही विशिष्ठ देशातून विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र, त्या देशांमध्येच विद्यापीठाचे कॅम्पस सुरू केले तर भारतात येऊन शिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना (student ) त्यांच्याच कॅम्पसमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उत्पन्नात वाढ होईल.त्यामुळे विद्यापीठाने परदेशात कॅम्पस (campus abroad) सुरू करावेत, भूमिका विद्यापीठाच्या रविवारी झालेल्या अधिसभेत मांडण्यात आली.

हेही वाचा : शिक्षण कुलसचिव गहिवरले, कर्मचारी संघटनेचा सिनेटमध्ये गोंधळ  
 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांची व क्लस्टर विद्यापीठांची संख्या वाढणार आहे.परिणामी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या कमी होणार आहे.परिणामी विद्यापीठाच्या उत्तपन्नात घट होणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विद्यापीठाचे परदेशातही आपले कॅम्पस सुरू करावेत,अशी भूमिका विद्यापीठाचे मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे यांनी परदेशात कॅम्पस सुरू करण्याची भूमिका अधिसभेत मांडली.त्याच बरोबर इतरही अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या निधीत होत घट होत असाल याबाबत चिंता व्यक्त केली.तसेच विद्यापीठाच्या उत्पन्नाचे सोर्स वाढवण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 नेपाळ सारख्या देशातून पुणे विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे येथे कॅम्पस सुरू करता येईल का ? यांचा विचार करावा,असे मत खरे यांनी मांडले.तसेच विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी संशोधन करावे,पेटेंटच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा,असे मत व्यक्त केले.त्यावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी सर्व अधिसभा सदस्यांना विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षात निधी उभारणीत हातभार लावावा,अशी अपेक्षा व्यक्त केली. 
 दरम्यान,परदेशात कॅम्पस सुरू करण्यासंदर्भातील  विद्यापीठाकडे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे.