पुण्यात  'बी' दर्जाच्या शाळांची संख्या सर्वाधिक 

पुणे जिल्ह्यातील अनुदानित व अंशत: अनुदानित तब्बल १६४ शाळा 'बी' दर्जाच्या असून केवळ सहा शाळा 'ओ' दर्जाच्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यात  'बी' दर्जाच्या शाळांची संख्या सर्वाधिक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे जिल्ह्यातील (Pune district ) अनुदानित व अंशत: अनुदानित तब्बल १६४ शाळा 'बी' दर्जाच्या (B grade) असून केवळ सहा शाळा 'ओ' दर्जाच्या (O grade) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे (Zilla Parishad Secondary Education Department ) यासंदर्भातील शाळांची अंतिम शाळा मूल्यांकन व स्तर निश्चितीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे.

हेही वाचा : शालार्थ आयडी : शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आठवड्याभरात प्रस्तावावर निर्णय

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे जिल्हा परिषदेतर्फे शाळा मूल्यांकन स्थर निश्चित करण्यात आला होता. त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या त्यानंतर समितीने शाळांची ग्रेडेशनची अंतिम यादी जाहीर केली.त्यातून शाळांची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील विद्याधाम प्रशाला , खेड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर,  हडपसर येथील साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनिअर हायस्कूल, शिरूर मधील कै. रा.गो. पलांडे माध्य. आश्रम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच संभाजीराजे विद्यालय जातेगाव बु. आणि हडपसर येथील तुपे साधना कन्या विद्यालय या सहा शाळांना ओ ग्रेड मिळाला आहे.

जिल्ह्यातील २८  शाळांना 'ए'  ग्रेड मिळाला असून ४६  शाळांना 'बी' प्लस ग्रेड मिळाला आहे तर १६४  शाळांना 'बी' ग्रेड मिळाला आहे. यावरून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या दर्जा खालवला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शाळांची अशी स्थिती असेल तर खरंच पुणे हे विद्येचे माहेरघर आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो.