JNU NEWS: प्राध्यापकाने केला परदेशी संशोधक विद्यार्थीनीचा लैंगिक छळ

अंतर्गत तक्रार समिती (ICC) च्या  चौकशीनंतर कार्यकारी परिषदेने संबधित प्राध्यापकाची बडतर्फीची शिफारस केली. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहे. संशोधन प्रकल्पावरील तथ्य शोध समितीच्या अहवालानंतर दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

JNU NEWS: प्राध्यापकाने केला परदेशी संशोधक विद्यार्थीनीचा लैंगिक छळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लैंगिक गुन्ह्यांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहेत. आता देशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्राध्यापकावर परदेशी संशोधक विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर संबंधित प्राध्यापकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. 

एका नामांकित वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ  (Jawaharlal Nehru University) जेएनयू येथे ही घटना काही महिन्यांपूर्वी विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान घडली होती. पीडिता विद्यार्थीनी एक जपानी संशोधक आहे. (A Japanese researcher) विद्यापीठाच्या एका कार्यक्रमादरम्यान एका प्राध्यापकाने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. जपानला परतल्यावर संशोधिकेने औपचारिक तक्रार दाखल केली. हे प्रकरण भारतीय दूतावासाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर ते परराष्ट्र मंत्रालय आणि विद्यापीठापर्यंत पोहोचले.