KIIT मधील नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर दोन्ही देशांमधील वातावरण तापले
विद्यपीठाने या नेपाळी विद्यार्थ्यांना कटक भुवनेश्वर रेल्वे स्थानकांवर सोडून दिले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी असा दावा केला की त्यांना पुरी-पाटणा ट्रेनमध्ये आरक्षणाशिवाय बळजबरीने चढवण्यात आले आहे. दरम्यान, मृत विद्यार्थिनीच्या चुलत भावाने भुवनेश्वरमधील इन्फोसिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याच विद्यापीठातील एक विद्यार्थी त्याच्या बहिणीला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
या संदर्भात माहिती देताना भुवनेश्वरचे डीसीपी पिनाक मिश्रा म्हणाले, "आरोपी विद्यार्थी ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. रविवारी विमानतळावर पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी मृत विद्यार्थिणीची खोली सील केली आहे. पालक येईपर्यंत मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला आहे. "
विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमधील हाणामारीचे आणि संस्थेचे अधिकारी निदर्शक विद्यार्थ्यांना धमकावतानाचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. दरम्यान, कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हे प्रकरण चिघळत असताना विद्यापीठाचे कुलसचिव जे.आर.मोहंती म्हणाले की, "आम्ही सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना परत येऊन वर्ग पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करतो."