अग्निवीर भरतीत मोठे  बदल: आता लेखी परीक्षा १३ भाषांमध्ये 

या वर्षापासून उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार भाषा निवडण्याचा पर्याय असेल. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड, उर्दू, गुजराती,पंजाबी, उडिया, बंगाली आणि आसामी या भाषांचा समावेश आहे. या शिवाय आणखीनही काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

अग्निवीर भरतीत मोठे  बदल: आता लेखी परीक्षा १३ भाषांमध्ये 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


  अग्निवीर लेखी परीक्षेत (Agniveer Written Exam) मोठा बदल करण्यात आला आहेत. आता उमेदवार १३ भाषांमध्ये परीक्षा देऊ शकतात. (Candidates can now give the exam in 13 languages) उमेदवार 13 पैकी  त्याला हवी असलेली कोणतीही भाषा निवडू शकतो. यापूर्वी, उमेदवारांना फक्त दोन भाषांमध्ये लेखी परीक्षा देण्याची संधी होती, यात  त्यांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन, सैन्याने हा बदल केला आहे.
या वर्षापासून उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार भाषा निवडण्याचा पर्याय असेल. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड, उर्दू, गुजराती,पंजाबी, उडिया, बंगाली आणि आसामी या भाषांचा समावेश आहे. 

या शिवाय आणखीनही काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यावेळी उमेदवारांची शर्यत चार श्रेणींमध्ये घेतली जाईल, ज्यामुळे निवड प्रक्रिया अधिक व्यवस्थित होईल. आता उमेदवार  एकाच CEE फॉर्ममध्ये दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे  पर्याय निवडावे  लागतील. तसेच  रॅली दरम्यान उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड आधारित पडताळणी अनिवार्य असेल. यासाठी अंगठा/बोटांचा ठसा आणि डोळ्याचा रेटिना स्कॅनिंग केले जाईल.
भारतीय सैन्यासाठी अग्निवीर परीक्षा २ टप्प्यात घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होईल. ज्यामध्ये १०० गुणांच्या संगणक आधारित ऑनलाइन लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या टप्प्यात भरती मेळावा होईल. यामध्ये शारीरिक कार्यक्षमता तपासली जाईल.