ICSI जून सत्र २०२५ CS परीक्षेसाठी अर्ज करण्याची विंडो या तारखेला पुन्हा उघडणार 

अर्जदारांना २० एप्रिल ते १ मे पर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत सीएस परीक्षा केंद्र, माध्यम, मॉड्यूल आणि पर्यायी विषयात बदल करण्याची परवानगी असेल. त्यांना १० ते १८ एप्रिल या कालावधीत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत पूर्वपरीक्षा चाचणी पूर्ण करावी लागेल.

ICSI जून सत्र २०२५ CS परीक्षेसाठी अर्ज करण्याची विंडो या तारखेला पुन्हा उघडणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (The Institute of Company Secretaries of India) ICSI ने घोषणा केली आहे की ते जून सत्र २०२५ CS परीक्षेसाठी अर्ज करण्याची विंडो १८ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. (The application window for the June session 2025 CS exam will reopen on April 18) उमेदवार अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट देऊन अर्ज करू  शकतात. आयसीएसआय सीएस जून अर्ज लिंक १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सक्रिय केली जाईल आणि १९ एप्रिल रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत खुली राहील.

जून २०२५ सत्रासाठी सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल परीक्षा १ ते १० जून दरम्यान २०१७ चा जुना अभ्यासक्रम आणि २०२२ चा नवीन अभ्यासक्रम या दोन्हीसाठी घेतल्या जातील. संस्था सकाळी ९ ते दुपारी १२.१५ या वेळेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेईल. पहिले १५ मिनिटे ICSI CS प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिले जातात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संस्थेने ११, १२, १३ आणि १४ जून हे दिवस राखीव ठेवले आहेत.

अर्जदारांना २० एप्रिल ते १ मे पर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत सीएस परीक्षा केंद्र, माध्यम, मॉड्यूल आणि पर्यायी विषयात बदल करण्याची परवानगी असेल. त्यांना १० ते १८ एप्रिल या कालावधीत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत पूर्वपरीक्षा चाचणी पूर्ण करावी लागेल.

जून २०२५ च्या सीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांनी किमान पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत,  इयत्ता १०वी किंवा मॅट्रिकचे विद्यार्थी किंवा अकरावीत शिकणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील.  पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास  पात्र असतील. पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी किंवा वाणिज्य, व्यवस्थापन किंवा कायदा शाखेत सीएस, सीए, सीएमए, एलएलबी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले किंवा करत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत.