कॅनडातील वाढत्या कचर्याला भारतीय विद्यार्थ्यांना धरले जबाबदार
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, कॅनडातील एक सुंदर बर्फाच्छादित परिसर दिसत आहे, जिथे कचरा पसरला आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर कचरा पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, कॅनडातील एक सुंदर बर्फाच्छादित परिसर दिसत आहे, जिथे कचरा पसरला आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर कचरा पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे थेट नाव नसले तरी व्हिडिओमध्ये भारतीय ध्वज, भारतीय वंशाच्या व्यक्तीचे इमोजी आणि 'आंतरराष्ट्रीय विद्यार्थी बेकायदेशीरपणे कचरा फेकत आहेत' असा मजकूर वापरण्यात आला आहे.
X वर हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये कचरा पसरवल्याबद्दल थेट भारतीय विद्यार्थ्यांवर आरोप केले आहेत. तिचे कॅप्शन लिहिले आहे, 'भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संपूर्ण कॅनडा उद्ध्वस्त करत आहेत.' हा व्हिडिओ आतापर्यंत 6.5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच वादाला तोंड फुटले आहे. जवळपास 8 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर 800 लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.