सीमा सुरक्षा दल अंतर्गत २५२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत सहायक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलपदांच्या एकूण २५२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. 

सीमा सुरक्षा दल अंतर्गत २५२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय सैन्यात भरती होवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत सहायक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल (Assistant Sub-Inspector, Head Constable Recruitment) पदांच्या एकूण २५२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. 

अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांना भरती शाखा, महासंचालनालय, बीएसएफ ब्लॉक -१०, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली या पत्त्यावर विहित तारखेच्या आता अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा लागणार आहे. नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नसल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. 

या भरती मोहिमेअंतर्गत सहायक उपनिरीक्षक पदाच्या ५८ जागा तर हेड काॅन्स्टेबल पदाच्या १९४ जागा अशा एकूण २५२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराने १२ उत्तीर्ण किंवा समकक्ष ही शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने किमान १८ वर्षे पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे तर कमाल ३५ वर्षे वयोमर्यादा असावी. भरती नियमानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अधिक तपशिलवार माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ  https://rectt.bsf.gov.in/ ला भेट द्यावी.